Pfizer नंतर Moderna लशीलाही अमेरिकेकडून हिरवा कंदिल

Donald Trump Corona
Donald Trump Corona

वॉशिंग्टन : गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुडकूस घातला आहे. कोरोनावरील लस लवकरात लवकर आणता यावी यासाठी युद्धपातळीवर काम सुरु होतं. कोरोनावरील काही लशींना मान्यता दिली गेली असून अद्याप इतर लशींवर काम सुरु आहे. अमेरिका हा देश कोरोनाच्या कहराने सर्वांत जास्त पीडित ठरला आहे. दररोज साधारण 3 हजार मृत्यूंचा सामाना करणाऱ्या अमेरिकेने फायझर लशीला मान्यता दिली होती. यानंतर आता अमेरिकेच्या फूड एँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनच्या पॅनेलने मॉडर्नाच्या कोरोना लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.


याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी म्हटलंय की मॉडर्ना लशीचे वितरण तात्काळ सुरु होईल. याआधी अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच फायझरद्वारे विकसित केली गेलेली कोविड-19 लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, अमेरिकेत लशीकरणास सुरवातही झाली आहे. कमी प्रमाणात उपलब्ध असणारी ही लस जास्तकरुन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे.

हेही वाचा - ‘गुगल’च्या मक्तेदारीला अमेरिकेत आव्हान;प्रभावाचा गैरवापर केल्याची टीका
या दोन्हीही लशी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत तसेच त्या परिणामकारक देखील आहेत, असं चाचण्यांमधून आलेल्या निष्कर्षात स्पष्ट झालं आहे. मात्र, यातील मॉडर्नाची लस हाताळायला तसेच वापरायला सोपी आहे. कारण या लशीला फायझर लशीसारखं -75 डिग्री सेल्सीयस तापमानामध्ये ठेवण्याची गरज भासत नाही. अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 3 लाख 12 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी एका दिवसातच 3 हजार 600 अमेरिकन लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 17 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.


फायझर आणि मॉडर्ना लशीत हा आहे फरक
फायझरची कोरोना लस -75 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवणे अनिवार्य आहे. ही लस कोणत्याही इतर लशीच्या तुलनेत जवळपास 50 डिग्रीने अधिक थंड असली पाहिजे. लशीला समाप्त होण्याआधी केवळ पाच दिवसांपर्यंतच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं जाऊ शकतं. फायझरची लस हॉस्पिटल तसेच प्रमुख संस्थांसाटी अधिक वापरली जाऊ शकते.
तर मॉडर्ना लशीची खासियत ही आहे की या लशीला अतिशीत तापमानात ठेवण्याची गरज नाहीय. मॉडर्नाच्या लशीला -20 डिग्री सेल्सियसमध्ये घरी या फ्रिजरच्या तापमानात ठेवलं जाऊ शकतं. लशीला समाप्त होण्याआधी 30 दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्येही ठेवलं जाऊ शकतं. फायझरची लस 16 वर्षे आणि त्यावरील लोकांना दिली जाऊ शकते तर मॉडर्नाची लस 18 वर्षे आणि त्यावरील लोकांना दिली जाऊ शकते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com