अद्दल घडली का? ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चीनने उडवली खिल्ली

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 2 October 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

बिजिंग- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वात शक्तीशाली देशाच्या प्रमुखाला कोविड-19 ची लागण झाली असल्याने जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी कामना केली आहे. असे असले तरी चीनने यावरुनही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी ट्विट करुन ट्रम्प आणि मेलानिया यांची खिल्ली उडवली आहे. 

भारतीयांना दिलासा देत ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका

ट्रम्प यांनी किंमत चुकवली

संपादक हू शिजिन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांनी कोविड-19 विषाणूला गंभीरतेने घेतले नाही. त्याची किंमत आता दोघेही चुकवत आहेत. या बातमीने अमेरिकेत कोरोना किती थैमान घालत आहे, हे स्पष्ट होते. यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची नकारात्मक प्रतिमा तयार होईल. याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल''.

ट्रम्प यांची चीनवर टीका 

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून चीनने कोरोना विषाणू संबंधातील माहिती जगापासून लपवली, असा आरोप त्यांनी केला होता. ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला चिनी विषाणू देखील म्हटलं आहे. कोरोना महामारीमुळे अमेरिकेत थैमान घातले आहे. लाखो नागरिकांचा जीव या विषाणूमुळे गेला आहे. 

लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या ८ गोष्टी, असा पंतप्रधान...

दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत वाढत असतानाच ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोना झाल्याच समोर आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होप हिक्स एअर फोर्स वनमधून नेहमीच प्रवास करते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump test corona positive china comment on that