
इराणच्या ताब्यातील मायकेल व्हाईट या अमेरिकन बंधकाला सोडून देण्याचा निर्णय इराणने घेतल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल गुरवारी ट्विटर च्या माध्यमातून इराणचे आभार मानले आहेत.
वॉशिंग्टन : इराणच्या ताब्यातील मायकेल व्हाईट या अमेरिकन बंधकाला सोडून देण्याचा निर्णय इराणने घेतल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल गुरवारी ट्विटर च्या माध्यमातून इराणचे आभार मानले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याशिवाय आपल्यात करार होऊ शकतो हेच या घटनेतून सिद्ध होत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने मायकेल व्हाईट याची मुक्तता केल्यामुळे ट्विटरवर इराणला धन्यवाद म्हणत, मोठा करार करण्यासाठी अमेरिकेच्या आगामी निवडणुकीची प्रतीक्षा न करता आपणच ही निवडणूक जिंकणार असल्याने इराणला आत्ताच अमेरिकेसोबत चांगला करार करण्यासंदर्भात पुढे येण्याचे निमंत्रण दिले त्यांनी दिले आहे.
----------
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
-----------
इराणने अमेरिकन बंधक मायकेल व्हाईट याला सोडण्याचा घेतलेला निर्णय व अमेरिकेने मजीद तहरी यांना इराणला जाऊ देण्याच्या हालचालींना वेग दिल्यामुळे, इराणचे परराष्ट्रमंत्री आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना पुन्हा नव्याने सुरवात होणार असल्याचे म्हटले आहे.
इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखण्यासाठी केलेला करार आणि वर्षाच्या सुरवातीला इराणच्या लष्कर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला विस्तव कमी होण्याच्या मार्गावर आहे. इराणने अमेरिकन बंधक मायकेल व्हाईट याला सोडण्याचा घेतलेला निर्णय आणि दोन्ही देशांचे नागरिकत्व असलेले मजीद तहरी यांना इराणला जाऊ देण्याच्या अमेरिकेच्या हालचाली, या दोन्ही कारणामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान, इराणच्या अणुप्रक्रियेला आळा घालण्यासाठी केलेला करार अमेरिकेने एकतर्फी मोडल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध अधिकच बिघडले होते. तसेच यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बध घातल्याने हा वाद आणखीनच चिघळला होता. व अशातच यावर्षाच्या सुरवातीला अमेरिकेने ड्रोनद्वारे कारवाई करत इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांना ठार मारले होते. त्यामुळे इराण आणि अमेरिकेचे संबंध पूर्णताच तुटले होते.