पाकिस्तानला मोठा धक्का; ट्रम्प यांचा मध्यस्थीस नकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी करावी असा प्रस्ताव कधीच माझ्यापुढे आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी मध्यस्थीस नकार दिला आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार हे स्पष्ट झाले आहे.

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान दरम्यान  काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी करावी असा प्रस्ताव कधीच माझ्यापुढे आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी मध्यस्थीस नकार दिला आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची खेळी अपयशी ठरली आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती केल्याचे म्हटले होते. यावर भारताने आक्षेप घेतला होता. अखेर अमेरिकेने आपण मध्यस्थी करणार नसल्याचे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump withdraws Kashmir mediation offer