esakal | फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden

फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आरोप लावत म्हटलंय की, सोशल मीडियाने लोकांची हत्या केली आहे. बायडन यांनी म्हटलंय की, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कोरोना व्हायरस आणि लशीसंदर्भात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे.

बायडन यांनी ट्विट केलंय की, फेसबुकवर म्हटलं जातंय की कोरोना महासाथीमध्ये लशीकरणाची गरज नाही. चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण बनलं आहे. सोबतच लोकांचा जीव देखील जात आहे. मात्र, दुसरीकडे फेसबुकने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे आरोप नाकारले आहेत. फेसबुकने म्हटलंय की, लशीकरणामुळेच लोकांचा जीव वाचतो आहे.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी म्हणाले की, फेसबुक आणि इतर लोक कोरोना लसीकरणाबबात जनजागृती करत नाहीयेत. गुरुवारी अमेरिकेमध्ये सीडीसीने 33,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद केली असून, सात दिवसांची सरासरी 26,306 पर्यंत पोहोचली आहे, त्यापूर्वीच्या आठवड्यात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सात दिवसांत रुग्णालयात दाखल होणारी सरासरी संख्या दररोज 2,790 आहे, ही संख्या 36 टक्क्यांनी वाढत आहे. आणि सात दिवसांच्या मृत्यूची सरासरी 211 असून मृत्यू दरात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

loading image