
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह
Joe Biden Corona Positive: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना कोरोना विषाणूची अत्यंत सौम्य लक्षणे दिसली असून त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी त्यांना पॅक्सलोविड (Paxlovid) हे अँटीव्हायरल औषध देण्यास सुरुवात केली आहे. (US President Joe Biden tests positive for corona)
सेक्रेटरी कॅरिन यांनी सांगितले की, या काळात राष्ट्रपती आपले सर्व काम प्रेसिडेंट करत राहतील. आज सकाळपासून ते व्हाईट हाऊसच्या कर्मचार्यांच्या संपर्कात आहेत आणि फोन किंवा झूमद्वारे त्यांच्या सर्व बैठका घेत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेचे 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष बायडेन (Joe Biden) यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच फायझरच्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय, त्यांनी सप्टेंबरमध्ये पहिला बूस्टर डोस आणि त्यानंतर 30 मार्चला अतिरिक्त डोस देखील घेतला आहे.
Web Title: Us President Joe Biden Tests Positive For Corona Says White House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..