esakal | बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिला अमेरिका दौरा
sakal

बोलून बातमी शोधा

बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा

बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘क्वाड’ (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) देशांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. ‘क्वाड’ मध्ये भारतही सहभागी आहे. 24 सप्टेंबर रोजी ‘क्वाड’ परिषद अमेरिकेत होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. ‘क्वाड’मधील देशांचे नेते पहिल्यांदाच समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 24 सप्टेंबर रोजी वॉशिंग्टनमध्ये क्वाड परिषदेचं आयोजन केलं आहे. व्हाइट हाऊसने त्याबाबतची माहिती आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे.

वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या क्वाड परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपस्थित असतील. 12 मार्च 2021 रोजी झालेल्या पहिल्या व्हर्च्यूअल परिषदेनंतर झालेली प्रगती आणि सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर क्वाड परिषदेत चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top