esakal | US Election 2020: राष्ट्राध्यक्षपदापासून बायडन केवळ 6 पावलं दूर तर ट्रम्प गेले कोर्टात
sakal

बोलून बातमी शोधा

biden trump main.jpg

मिशिगन राज्यात विजय मिळवल्यानंतर बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज आहे

US Election 2020: राष्ट्राध्यक्षपदापासून बायडन केवळ 6 पावलं दूर तर ट्रम्प गेले कोर्टात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज आहे. 'फॉक्स न्यूज'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मिशिगन राज्यात विजय मिळवल्यानंतर बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज आहे, असे फॉक्स न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 99 टक्के बॅलेट मतांच्या मोजणीमध्ये बायडन यांना 49.9 टक्के तर ट्रम्प यांना 48.6 टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. 

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मिशिगनमधील मतमोजणी थांबवण्यासाठी न्यायालयात पोहोचले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांचे मॅनेजर बिल स्टिफन यांनी दिली. आम्ही मत मोजणी योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत ती थांबवावी, यासाठी आम्ही मिशगनच्या कोर्टात अपील केले आहे. आम्ही उघडल्या व मोजलेल्या मतपत्रिकांचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. कारण आम्हाला ती योग्य वाटत नाहीत, असे स्टिफन यांनी सांगितले. 

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, जो बायडन यांनी मिशिगन राज्यात विजय मिळवला आहे. गतवेळी या राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. 
 

loading image