नाझीच्या सैनिकास अमेरिकेने परत पाठवले 

पीटीआय
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बर्लिन (पीटीआय) : जर्मनीतील नाझी राजवटीच्या काळात मजुरांच्या छावणीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आणि नाझीच्या अमानवी छळाचा साक्षीदार असलेले 95 वर्षीय जॅकीव्ह पालिज यांना अमेरिकेने मायदेशी जर्मनीत पाठवून दिले. न्यूयॉर्कमध्ये सहा दशकांपासून राहणारे पालिज यांना अमेरिकेने ताब्यात घेतले होते. तब्बल पंधरा वर्षांच्या वाटाघाटीनंतर मंगळवारी त्यांची जर्मनीला रवानगी केल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे. 

जॅकिव्ह पालिज यांनी पोलंडच्या त्राविंकी येथील मजुराच्या छावणीत सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे. त्याठिकाणी 3 नोव्हेंबर 1943 रोजी 6 हजार ज्यू पुरुष, महिला आणि मुलांना मारण्यात आले होते. हा सर्वांत मोठ्या नरसंहारापैकी एक मानला जातो. पालिज हे ज्यू नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत होते आणि तेथून पळ काढणाऱ्यांना पकडून आणण्याचे कामही त्यांनी केले आहे. चौकशीअंती 2004 रोजी अमेरिकेने त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांच्या सरकारशी चर्चा सुरू होती आणि शेवटी त्यांनी पालिज यांना स्वीकारण्याचे मान्य केले.

पश्‍चिम जर्मनीतील डसेलडर्फ विमानतळावर पालिज यांना घेऊन लष्करी विमान उतरले. यानंतर त्यांना त्यांच्या घरी नेण्यात आले. आताच्या यूक्रेनमध्ये जन्मलेले पालिज हे 1949 रोजी अमेरिकेला गेले होते. 8 वर्षांनंतर त्यांना अमेरिकी नागरिकत्व मिळाले. यादरम्यान त्यांनी नाझी सेवा आणि मानवाधिकाराचे हनन करणाऱ्या कृत्यातील सहभागाबाबत गुप्तता पाळली होती. कारखान्यावर आणि शेतात काम केल्याचे सांगून जागतिक महायुद्धातही काही काळ घालवल्याची माहिती अमेरिकी प्रशासनाला दिली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US reinstated Nazi soldier