

किव्ह : रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असतानाच दोन्ही देशांदरम्यान शांतता निर्माण व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींची आजपासून सौदी अरेबियामध्ये बैठक सुरू झाली आहे. याआधी अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये अंशत: शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली आहे.