चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

पीटीआय
Sunday, 29 November 2020

इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची बाब चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची बाब चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराणने क्षेपणास्त्र मोहिमा राबविणे सुरुच ठेवल्याने अमेरिका त्याविरोधात कठोर उपाय सातत्याने करीत आहे. याचाच एक भाग म्हणून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याने  रशिया व चीनच्या चार कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचा निर्णय जाहीर केला. ‘क्षेपणास्त्रांची क्षमतेत वाढ करण्यापासून इराणला रोखण्यासाठी आम्ही आमचे सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरूच ठेवणार आहोत, असे पॉम्पिओ यांनी सांगितले. इराणच्या या विघातक कृतीच्या विरोधात आम्ही उचललेले हे पाउल असून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासंबंधी सर्व देशांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा

संवेदशील तंत्रज्ञानचा पुरवठा
निर्बंध घातलेल्या चीनमधील कंपन्यांत ‘चेंगडू बेस्ट न्यू मटेरिअल्स कंपनी लिमिटेड, झिबो एलिम ट्रेड कंपनी लिमिटेड आणि रशियातील निल्को ग्रुप जी नील फाम कझर या नावाने ओळखली जाणारी कंपनी आणि सॅंटेर्स होल्डिंग अँड जॉईंट स्टॉक कंपनी इलेकॉन या कंपन्यांचा समावेश आहे. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला या कंपन्यांनी तंत्रज्ञान पुरविल्याचा आरोप अमेरिकेने केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US sanctions on Chinese Russian companies