अमेरिकेच्या हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; गर्भपाताचा अधिकार केला रद्द

us supreme court ends constitutional right to abortion these states can ban on abortion now
us supreme court ends constitutional right to abortion these states can ban on abortion now

अमेरिकेत गर्भपात हा आता घटनात्मक अधिकार राहिलेला नाही.अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका ऐतिहासिक निर्णयात गर्भपाताचे अधिकार संपुष्टात आणले आहेत. यूएस सुप्रीम कोर्टाने 1973 च्या रोए विरुद्ध वेड (Roe v Wade) या खटल्यातील निर्णय रद्द केला. सुमारे 50 वर्षांपूर्वी, रो विरुद्ध वेड प्रकरणात, गर्भपाताचा स्त्रीचा अधिकार सुनिश्चित करण्यात आला होता.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गर्भपाताचा अधिकार संविधानात दिलेला नाही. 'रो विरूद्ध वेड' प्रकरण फेटाळण्यात आले आहे. आता अमेरिकेतील विविध राज्ये आपापल्या परीने गर्भपातावर बंदी घालू शकतात. शुक्रवारच्या निकालामुळे जवळपास अमेरिकेतील निम्म्या राज्यांमध्ये गर्भपातावर बंदी घातली जाऊ शकते.

us supreme court ends constitutional right to abortion these states can ban on abortion now
'एक हात मदतीचा'; भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारताची अफगाणिस्तानला मदत

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निर्णयानंतर आता अलाबामा, जॉर्जिया, इंडियानासह अमेरिकेची 24 राज्ये गर्भपातावर बंदी घालू शकतात.अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास आहे की गर्भपात हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेऊ शकत नाही.

मात्र, न्यायालयाच्या निर्णयाने अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर महिला मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत. मात्र, याशिवाय एक वर्गही न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल आनंद साजरा करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com