
वॉशिंग्टन : हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या, काम करणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या व्हिसा अर्जदारांची समाजमाध्यमांतील खाती अमेरिकी अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यांवर ज्यूविरोधी भावनांसंबंधी काही संकेत आढळतात का, याची छाननी केली जाणार आहे.