

US School Scandal: Secretary Caught With Student, Shocking Abuse Charges Follow
esakal
Union City School Scandal: अमेरिकेत युनियन सिटी येथील एका शाळेत कार्यरत असलेल्या ३१ वर्षीय महिला सचिवेला दोन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिने एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याशी अनेक वेळा अशा प्रकारचे संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्यावर पाच आरोप दाखल करण्यात आले आहेत. एका १८ वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवताना नवऱ्याने रंगेहात पकडल्यानंतर ही घटना उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले.