Gaza: युद्धबंदीच्या ठरावावर अमेरिकेचा नकाराधिकार; प्रस्ताव फेटाळल्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील देश नाराज
UN Security Council: संयुक्त राष्ट्रांच्या गाझा ठरावावर अमेरिकेने नकाराधिकार वापरून विरोध केला. ठरावात हमासचा निषेध नसल्यामुळे आणि इस्राईलला आत्मसंरक्षणाचा हक्क न दिल्यामुळे अमेरिकेचा निर्णय आला.
न्यूयॉर्क : गाझामध्ये तत्काळ आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी करावी तसेच बंधकांचीही तातडीने सुटका करण्यात यावी या विषयी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने गुरुवारी मांडलेला ठराव अमेरिकेने पुन्हा एकदा नकाराधिकार (व्हेटो) वापरत फेटाळला आहे.