प्राचीन काळी धूम्रपानासाठी वेगळ्याच प्रजातीचा वापर वाचा सविस्तर..

Smoking-pipe
Smoking-pipe

अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील स्थानिक  लोक १४०० वर्षांपूर्वी तंबाखूशिवाय वेगळ्याच वनस्पतीचा वापर पाइपमध्ये ओढण्यासाठी करत असल्याचे आढळले आहे. उत्खननामध्ये आढळलेल्या पाइपमध्ये सामान्यपणे स्मूथ सुमॅक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऱ्हूस ग्लॅब्रा ही वनस्पती आढळली आहे. हे संशोधन ‘जर्नल फ्रंटियर्स इन मॉलेक्युअर बायोसायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

मध्य वॉशिंग्टन येथील उत्खननामध्ये स्थानिक अमेरिकन लोकांच्या धूम्रपानाच्या पाइपमध्ये तंबाखूची एक प्रजातीचेही (N. quadrivalvis) अंश सापडले आहे. सध्या ही प्रजात या प्रदेशामध्ये लागवडीखाली नाही. मात्र, पूर्वी ती मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली असली पाहिजे. आत्तापर्यंत प्राचीन अमेरिकनांच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल सातत्याने बोलले जात असले तरी त्यात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वनस्पतींच्या मिश्रणांचे फारसे पुरावे मिळाले नव्हते. ऱ्हूस ग्लॅब्रा ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मयुक्त धुरासाठी तंबाखूसोबत वापरली जात असावी. याविषयी माहिती देताना संशोधक कोरे ब्राऊनस्टेईन यांनी सांगितले की, स्थानिक अमेरिकन प्रजातींमध्ये धूम्रपानाच्या सवयी या प्रामुख्याने धार्मिक आणि सण, उत्सवाच्या प्रसंगाशी जोडल्या जातात. अभ्यासामध्ये या समुदायासाठी काही विशिष्ट वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या असल्या दिसून आले आहे. 

संशोधनातील महत्त्वाचे... 
उत्खननामध्ये आढळलेल्या पाइपच्या अंशाच्या मेटॅबोलोमिक्स आधारित विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. या तंत्राने वनस्पतींच्या हजारो संयुगांचा शोध घेणे शक्य होते. पूर्वी यासाठी निकोटीन, अॅनाबेसिन, कॉटीनाईन आणि कॅफेन असे मर्यादित बायोमार्कर उपलब्ध होते. म्हणजेच निकोटीन किंवा तंबाखू असल्याचे कळत असले तरी त्याची नेमकी प्रजाती कोणती, हे समजू शकत नव्हते.  

मध्य वॉशिंग्टन येथील रहिवासी लोकांकडून वापरल्या गेलेल्या दुसऱ्या एका पाइपच्या विश्लेषणातून एक वेगळी तंबाखू प्रजाती ( N. rustica) आढळली होती. ती पूर्वेकडील किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये उगवली जात असे. यावरून अमेरिकेतील स्थानिक समुदाय हे तंबाखूच्या बिया आणि अन्य साहित्याचा एकमेकांशी व्यापार करत असल्याचे स्पष्ट होते. पुढे जेव्हा युरोपीय लोकांकडून तंबाखूचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर येथील स्थानिक तंबाखू जात हळूहळू नष्ट होत गेल्या असाव्यात, असे मत वॉशिंग्टन विद्यापीठातील साहाय्यक प्रा. शॅनोन तुशिंगहॅम यांनी व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राचीन वनस्पतींच्या वाढीसाठी हरितगृहाचा वापर
पश्चिमी लोक येऊन वसाहती करण्यापूर्वी प्राचीन अमेरिकन लोकांच्या वनस्पती व्यवस्थापनाच्या पद्धतीचा या संशोधनातून उलगडा होतो. नेझ पेर्स सारख्या आधुनिक स्थानिक समुदायांच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये प्राचीन काळातील शिल्लक अंशांचाही विचार करण्यात आला. त्यात तंबाखूचे धूम्रपान ही परंपरा नेझ पेर्स, कोलव्हिले आणि अन्य वायव्येतील भटक्या जातींमध्ये दिसून येते. त्यांचे पूर्वज नेमक्या कोणत्या प्रजातींच्या तंबाखूचा वापर करत होते, याविषयी आजवर उलगडा होऊ शकत नव्हता. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे ते शक्य होत आहे. 

ब्राऊनस्टेन यांनी सांगितले, की आम्ही एका संपूर्ण हरितगृहामध्ये नेझ पेर्स जातीच्या स्थानिक लोकांकडून मिळवलेल्या या वनस्पतींच्या बियांची वाढ करत आहोत. त्यातून या वनस्पतींखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकेल. याचा फायदा स्थानिक जातीसोबत नव्याने बंध तयार करण्यासाठी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com