नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार, अनेक जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

युट्रेक्ट (नेदरलँड) - न्युझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, आज नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

युट्रेक्ट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ट्राममध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी मदत कार्य सुरु झाले असून, यामध्ये सहकार्य करावे असे पोलिसांनी स्थानिकांना आवाहन केले आहे. 

दरम्यान, या गोळीबारात जीवितहानी झाली आहे की नाही याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. तसेच बाकी माहितीदेखील उपलब्ध होऊ शकलेली नाही.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Utrecht shooting several injured after gunman opens fire on tram in Netherlands