सर्व प्रकारच्या साथींना रोखण्यासाठी तयार करणार लस; केंब्रीज विद्यापीठाकडून पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

कोरोनावरील नव्या संभाव्य लशीची चाचणी सुरू करणार असल्याची घोषणा केंब्रीज विद्यापीठातर्फे करण्यात आली.

लंडन- कोरोनावरील नव्या संभाव्य लशीची चाचणी सुरू करणार असल्याची घोषणा केंब्रीज विद्यापीठातर्फे करण्यात आली. भविष्यात प्राण्यांपासून माणसांना होऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंचा प्रतिकार करण्याची क्षमता लशीत असू शकेल. 

वटवाघुळाचा संदर्भ 

ही लस बनवण्यासाठी सर्व ज्ञात कोरोना विषाणूच्या आनुवंशिक क्रमाच्या पेढीचा (बँक्स ऑफ जेनेटीक सिक्वेन्स) वापर करण्यात आला आहे. यात वटवाघुळाचाही समावेश आहे. माणसाला कोरोना विषाणूची लागण होण्यास वटवाघूळ हे नैसर्गिक माध्यम ठरल्याचे मानले जाते. 

अमेरिका पुन्हा पेटली; कृष्णवर्णीयावरील गोळीबारानंतर आंदोलनाला हिंसक वळण

सुईचे इंजेक्शन नाही 

या लशीने चाचण्यांचे सर्व टप्पे पार केल्यास डोस देण्यासाठी सुई नसलेले आणि टोचल्यास वेदन न होणारे इंजेक्शन वापरण्यात येईल. स्प्रिंगच्या दाबावर टोचल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा (स्प्रिंग-पॉवर्ड जेट इंजेक्शन) वापर करण्यात येईल. 

भविष्यात मानवासमोर धोका निर्माण करू शकणाऱ्या साथीच्या रोगांचा आम्ही विचार केला आहे. त्यादृष्टिने विषाणूमधील कमकुवत दुवे हेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. लशीच्या निर्मितीत हे भाग महत्त्वाचे ठरू शकतील, असं प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. जोनाथन हिनी म्हणाले आहेत.

पद्धती क्रांतिकारी 

डीऑसीनवॅक्सच्या सीइओ आणि विद्यापीठातील पदव्युत्तर संशोधिका डॉ. रिबेका किन्सली यांनी सांगितले की, जागतिक साथीवर वेगाने प्रतिबंध आणण्याची गरज असल्यामुळे बहुतांश संशोधन गटांनी लसनिर्मितीच्या प्रचलित पद्धतींचा वापर केला आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अहवाल सकारात्मक असतील अशी आपल्या सर्वांची आशा आहे, पण यशस्वी लशीला सुद्धा काही मर्यादा असतील. वैद्यकीयदृष्ट्या नाजूक व्यक्तींसाठी लस कदाचित उपयुक्त ठरू शकणार नाही. लशीचे परिणाम किती काळ टिकतील याचीही आपल्याला माहिती नाही. या पार्श्वभूमीवर आमची पद्धत क्रांतिकारी ठरेल, जी कोरोनासारख्या गुंतागुंतीच्या विषाणूविरुद्धच्या लढ्यात आदर्श ठरेल.

अमेरिकेचा मैत्रीचा दावा खोटा? भारताची पाकिस्तान, सीरियासोबत केली तुलना

संभाव्य लशीचे पारिभाषिक नाव - DIOS-CoVax2 

- SARS-CoV-2 [Covid-19] या विषाणूच्या स्वरूपाचे संगणकाच्या मदतीने त्रिमितीय प्रतिकृती तयार केल्या (3डी कंप्युटर मॉडेलिंग) 
- या विषाणूसह SARS, MERS तसेच प्राण्यांमधील इतर कोरोना विषाणूंचाही वापर 
- विषाणूंचा वापर करून प्रतिकारशक्तीला योग्य दिशेने चालना देणारी लस बनविण्याचा प्रयत्न 
- स्थिर संयुग बनवण्यासाठी पेशीतील एका रेणूची दुसऱ्या रेणूशी होणाऱ्या क्रियेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा विषाणूचा भाग लक्ष्य करणार 
- प्रतिकूल ठरणारे इतर भाग वापरणे टाळणार 
- विद्यापीठातील व्हायरल झुनॉटीक्स प्रयोगशाळा व संलग्न संस्था डिऑसीन वॅक्स (DIOSynVax) या संस्थांचा निर्मितीत सहभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccines to prevent all types of outbreaks Initiative from Cambridge University

Tags
टॉपिकस
Topic Tags: