'व्हॅलेंटाइन डे'ची भन्नाट ऑफर; हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास 18 वर्ष मोफत स्टे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

ओटावा (कॅनडा): व्हॅलेंटाइन डे म्हटलं की अनेक प्रेमी युगुल या विशेष दिवशी काही तरी अनोखं करण्याचा प्लॅन करतात. तरूणांच्या आवडत्या दिनी अनेक व्यावसायिक आकर्षित ऑफरचा फायदा देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत असतात. 
यातच कॅनडातील एक हॉटेल चर्चेचा विषय ठरत आहे. 

कॅनडातील एका हॉटेलने प्रेमी युगुलांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या हॉटेलमध्ये व्हॅलेंटाइन डेला जर तुम्ही राहिलात आणि त्याचदरम्यान तुमची पार्टनर गरोदर राहिली तर पुढील 18 वर्षांसाठी हे हॉटेल तुम्हाला येथे मोफत राहण्याची संधी देणार आहे. कॅनडातील हॉटेल झेड ने ही ऑफर आपल्या ग्राहकांसाठी दिली आहे. 

हॉटेल झेड हे व्हिक्टोरिया आणि किलोन येथे आहे. हॉटेलने यासाठी तयार केलेल्या प्रोमोद्वारे म्हटले आहे की, हॉटेलमध्ये प्रेमी युगुल व्हॅलेंटाइन दिवशी राहिल्यास आणि त्या दरम्यान जर महिलेने गरोदर राहून, पुढील नऊ महिन्यात बाळाला जन्म दिल्यास 18 वर्ष संधी दिली जाईल. त्या प्रेमी युगुलांकडून हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत.

हॉटेलचे सीईओ मँड फार्मर यांनी सांगितले की, "जर एखाद्या प्रेमी युगुलाला बाळ हवं असल्यास ते आमच्या हॉटेलमध्ये येऊन या ऑफरचा फायदा मिळवू शकतात. तसेच या दिवशी हॉटेलमध्ये राहत असताना सरोगसी पद्धत किंवा मूल दत्तक घेऊनही तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता, असं हॉटेलकडून सांगण्यात आलं आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day Offer Couple gets free staying if they remained pregnant on valentine day