Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

Aircraft Fire Accident : या भीषण विमान दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना!  उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

esakal

Updated on

Venezuela Plane Crash Video : व्हेनेझुएलाच्या ताचिका राज्यात गुरुवारी एक भयानक विमान दुर्घटना घडली. पॅरामिलो एअरपोर्टवरून उड्डाण घेत असताना एका खासगी विमानाचा PA-31 अचानक मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच या विमानाचे मोठ्या आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोनजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. 

या भीषण विमान दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, विमानाने नेमकंच उड्डाण घेतलं आणि काही सेकेंदातच पुन्हा ते धावपट्टीवर कोसळलं व मोठा स्फोट झाला आणि आगीच्या गोळ्यात त्याचं रूपांतर झालं.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ही दुर्घटना पॅरामिलो एअरफील्ड येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार विमान उड्डाण घेत असतानाचा त्याचे एक टायर फुटले, ज्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर कोसळले.

Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना!  उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर
flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

या दुर्घटनेचा व्हिडिओ शूट झाला आहे, ज्यामध्ये विमानतळावरील नागरिकांची आरडाओरडी एकू येत आहे. दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली असून, जखमींना तातडीन रूग्णालयात दाखल केले गेले आहे. स्थानिक रिपोर्ट्स नुसार हे विमान सरकारी लॉजिस्टिक्सच्या कामाशी संबंधित होते. खरंतर हे अमेरिकन कंपनीचे डबल इंजिन असणारे विमान त्याची कामगिरी आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com