पॅरिसमध्ये मोठा स्फोट? स्थानिक पोलिसांनी केला खुलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्फोटाचा मोठा आवाज ऐकायला आला आहे.

पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्फोटाचा मोठा आवाज ऐकायला आला आहे. आवाज इतका मोठा होता की पॅरिस आणि आसपासच्या भागातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

पॅरिस पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. पॅरिस आणि आसपासच्या भागात मोठा आवाज ऐकायला आला आहे. हा कोणता स्फोट नसून लढाऊ विमानाने आपली ध्वनी मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे लोकांनी भिती बाळगू नये, शीवाय लोकांनी इमरजेंसी फोन क्रमांकावर फोन करु नये, असं पोलिसांनी ट्विट करुन सांगितलं आहे. 

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांचं घर किती हजार कोटींचं?

मोठा आवाज पूर्ण शहरभर ऐकायला आला होता. अनेकांच्या घरांच्या खिडक्या हादरल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली होती. चार्ली हेब्दोच्या जून्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला होता. फ्रान्स सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हटले होते. त्यामुळे रहिवाशी भितीच्या छायेत होते. त्यातच हा मोठा आवाज ऐकू आल्याने लोकांचा थरकाप उडाला.  आवाज ऐकू आल्यानंतर सोशल मीडियावर यासंबंधीचे मेसेज फिरु लागले आहेत. कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A very loud noise was heard in Paris

Tags
टॉपिकस
Topic Tags: