नाचते रहों, व्हायरस हारेगा! कोरोनाग्रस्तांच्या डान्सचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सुस्मिता वडतिले 
Saturday, 5 September 2020

एका आयपीएस अधिका-याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही कोरोना रूग्ण वाढदिवसाची पार्टी साजरा करत आहेत आणि सर्वजण मोठ्या आनंदात नाचत आहेत.

पुणे : आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत, ज्यांना प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचे कारण सापडते. असाच एक व्हिडिओ नुकताच कोरोना हॉस्पिटलमध्ये दिसून आला आहे. जेथे काही कोरोना रूग्ण मोठ्या आनंदाने रुग्णालयात वाढदिवसाची पार्टी साजरा करत आहेत. एवढेच नव्हे तर पार्टीमध्ये हे कोरोना रूग्णही अगदी मस्त आनंदात नाचत आहे. एका आयपीएस अधिका-याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही कोरोना रूग्ण वाढदिवसाची पार्टी साजरा करत आहेत आणि सर्वजण मोठ्या आनंदात नाचत आहेत.

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. आपल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, @dalermehndi या गाण्यांवर दोन मिनिटे नाचून सर्वात मोठी निगेटिव्हिटी गायब होईल. कोविड 19 हॉस्पिटलमध्ये वाढदिवसाची पार्टी केली जात आहे. तुम्ही नेहमी हसत राहा, मनापासून डान्स करा, काळजी घ्या, व्हायरस कमी होईल. या व्हिडिओमध्ये तेथे उपस्थित सर्व कोरोना पेशंट 'दलेर मेंहदी' या गाण्यांवर नाचून त्याचा आनंद घेत आहेत. तसेच व्हिडिओमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे आणि बरेच लोक त्यांच्या मोबाईलवरून तेथे असलेल्या डान्सचा व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करत आहेत. 

 

हा व्हिडिओ पाहताना असे दिसत आहे की, तिथे सर्व कोरोनाचे पेशंट आहेत. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि त्याची विचारसरणीसुद्धा किती सकारात्मक दिसून येत आहे. म्हणूनच ते पेशंट सर्वकाही विसरून मोठ्या उत्साहाने वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद घेत आहे. अर्थातच हे देखील खरे आहे की, आपण नकारात्मक विचार केला नाही तर, आपण कोणत्याही रोगाला किंवा अडचणीला लगेच हरवू शकू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The video of the birthday party being celebrated at Covid 19 Hospital is going viral