झाडावर साप विसावा घेत होता, ते मुंगूसने पाहताच त्याचा चेहरा पकडला आणि पुढे...

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 9 September 2020

साप आणि मुंगूस या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका झाडावर साप आराम करत आहे, तेव्हा मुंगूसची नजर सापावर गेली आणि त्याने उडी मारून त्याचा चेहरा तोंडात पकडलेला दिसत आहे.

पुणे : साप आणि मुंगूस या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका झाडावर साप आराम करत आहे, तेव्हा मुंगूसची नजर सापावर गेली आणि त्याने उडी मारून त्याचा चेहरा तोंडात पकडलेला दिसत आहे.

 

हा व्हिडिओ पश्चिम नाशिक विभाग, महाराष्ट्र उपवनसंरक्षक कार्यालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, साप झाडाच्या फांद्यांवर विसावा घेतलेला दिसत आहे. त्यावेळी मुंगूस तिथे पोहचतो. आधीपासूनच मुंगूस हा सापाचा शिकार करण्यासाठी ओळखला जातो. बर्‍याच वेळ खाली थांबल्यानंतर मुंगूसने झटकून सापावर हल्ला करण्याचा विचार केला. मुंगूसने उडी मारली आणि सापाला खाली पाडलं. मुंगूसने त्याच्या जबड्यात सापाचे तोंड दाबले.

डीसीएफ वेस्ट नाशिकने ट्विटरवर व्हिडिओवर लिहिले आहे की, 'जितके प्राणी छोटे तितके ते धीट असतात.' साप आणि कोबराशी लढण्यासाठी आणि मारण्यासाठी मुंगूस प्रसिद्ध आहेत. साप विरुद्ध मुंगूस या फाईटने अनेक प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या फाईटला 'क्रूर' असे वर्णन केले, तर काहींनी ते 'भयानक' असल्याचे म्हटले आहे. असा हा साप आणि मूंगूसचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A video of both the snake and the mongoose is going hugely viral on social media