अशा प्रकारे, कुत्र्याने वाचवला माशाचा जीव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

सोशल मीडियावर कुत्रा आणि माशाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे कोणाचेही डोळे भरून येतील. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा माशांचे जीव  वाचवत असल्याचे दिसत आहे.

पुणे : सोशल मीडियावर रोज काही ना काही अपडेट सुरूच असतात. त्यात काही हटके व्हिडिओ आणि फोटोज असतील तर ते तुफान व्हायरल होतात. तसाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक कुत्रा माशाचे प्राण वाचवताना दिसून येत आहे. या व्हिडिओमधून असे दिसून येत आहे की, प्रत्येकांनी एकमेकांना मदत केलीच पाहिजे. 

सोशल मीडियावर कुत्रा आणि माशाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे कोणाचेही डोळे भरून येतील. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा माशांचे जीव  वाचवत असल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ बॅक तो नेचर वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप प्रेरणादायक ठरत आहे. 

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मासे पाण्याशिवाय त्यांचे शेवटचे श्वास मोजत आहेत. जेव्हा कुत्र्याची नजर माशांवर पडते तेव्हा त्याच्या मनात दया येते. मासे बेशुद्ध अवस्थेत असल्याने कुत्रा त्यांना एक एक करून पाण्याने भरलेल्या टबमध्ये ठेवत आहे. हे पाहून कुत्रा आरामात श्वास घेतो आणि उरलेल्या माशांना वाचवण्याचेही धैर्य त्याला मिळते.

या व्हिडिओ मधून माणुसकी दिसून आली आहे. अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला असून हजारो लोकांनी रीट्वीट केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A video of a dog saving a fish's life is going viral on social media