esakal | व्हायरल व्हिडिओ : डॉल्फिन फिशच्या अनोख्या युक्त्या; पाहून तुम्हीही चकित व्हाल

बोलून बातमी शोधा

The video of Dolphin Fish presenting unique tricks is going viral on social media }

डॉल्फिन फिशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही चकित व्हाल. 

व्हायरल व्हिडिओ : डॉल्फिन फिशच्या अनोख्या युक्त्या; पाहून तुम्हीही चकित व्हाल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सामान्य जीवनातल्या काही गोष्टी वगळता गोष्टी सोशल मीडियावर काही गोष्टी लगेच व्हायरल होतात. प्राणी, पक्षी ई.चे जग अर्थातच मानवाच्या जगापेक्षा खूप वेगळे असते. परंतु बर्‍याच प्रकारे काही गोष्टी एकसारख्याच असतात. प्राणी, पक्षी त्यांच्यात भावना देखील असतात, ते देखील कधी आनंदी कधी दु: खी असतात. ते आपापसात खेळतात, भांडतात आणि शर्यतही लावतात. त्याच प्रमाणे डॉल्फिन फिशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही चकित व्हाल. 

जगभरात डॉल्फिन फिशला चांगलीच पसंत दिली जाते. लोक त्यांच्या युक्त्या पाहण्याची प्रतीक्षा करतात. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतआहे. हा व्हायरल व्हिडिओ काही तासांत तो हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये डॉल्फिन फिश पाण्यात कला सादर (Water Adventure) करताना दिसत आहे.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहूच्या कॅप्शननुसार सांता बार्बरामध्ये व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. पाण्याखाली केलेल्या वॉटर अ‍ॅडव्हेंचरने पुन्हा हे सिद्ध केले की मछली जल की रानी आहे. या व्हिडिओमध्ये निसर्गाची कमाल स्पष्टपणे दिसत आहे आणि आपल्यासाठी हे स्मरण आहे की आपण हा खजिना कायम ठेवला पाहिजे.

या व्हिडिओमध्ये 3 डॉल्फिन फिश लाटांशी खेळताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहताना असे दिसते की जणू ते आपापसात एखादी शर्यत लावलेली आहे. ते खेळत आहेत किंवा मजा करीत आहेत. त्यांच्या खेळात, लाटा देखील खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या प्रत्येक डाईव्हसह पडत्या लाटा पाहून असे वाटते की तेसुद्धा त्यांच्या खेळात सामील झाले आहेत. हा हॉलीवूड चित्रपटाचा इफेक्ट्स असल्याचा दिसत आहे.