हाफिज सईदला कोणी हात लावू शकत नाही...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कराचीः मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला कोणी हात लावू शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे दिग्गज पत्रकार बिलाल फारुखी यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे.

कराचीः मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला कोणी हात लावू शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे दिग्गज पत्रकार बिलाल फारुखी यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे.

पाकिस्तानचे मंत्री शहरयार अफ्रिदी यांचा एक मिनीटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते हाफिज सईदला सुरक्षा देण्याचे आव्हान करताना कोणी हातही लावू शकत नाही असे म्हणताना दिसतात. या व्हिडीओमध्ये शहरयार अफ्रिदी काही लोकांसोबत चर्चा करत आहेत. अमेरिकाच्या दबावामुळे हाफिजच्या पक्षाची निवडणूक आयोगाने नोंदणी केली नाही या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावर आफ्रिदी म्हणाले की, ‘इंशा अल्लाह! जोपर्यंत संसदेत मी आहे. तोपर्यंत पाकिस्तानसोबत असणाऱ्याचा हात सोडणार नाही.’

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान एका बाजूला दहशतवाद संपवण्याच्या गोष्टी करत आहेत. तर, दुसरीकडे त्यांचेच एक मंत्री दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. पाकिस्तानचे मंत्री शहरयार अफ्रिदीमंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हाफिद सईदला पाकिस्तान सरकार पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून, ती 35 कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video shows pak minister vowing to protect-hafiz saeed