13 फूट मगरीने चलाखीने केली बदकाची शिकार; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

सध्या एका मोठ्या मगरीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

फ्लोरिडा: सध्या एका मोठ्या मगरीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. पाण्यामध्ये मगरीने हुशाराने बदकाची शिकार (Alligator Devouring A Duck) केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

बरेच लोक या घटनेला ज्युरासिक पार्क (Jurassic Park) चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे असल्याचे सांगत आहे. फ्लोरेडा येथील एका नदीत 13 फूट लांबीची मगर बदकाची शिकार करत होती. त्या मगरीने लोकांसमोर त्याची शिकार केली.

लीसबर्गमध्ये केविन स्टाइप आणि कास कोवे बदकांची शिकार करण्यासाठी गेले होते. त्यानंतर तिथे त्यांनी मोठ्या मगरीला बदकाची शिकार करताना पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ काढून त्यांनी फेसबूकवर शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहताना, 'हे फक्त फिशिंग मोठ्या मगरीने शिकारीदरम्यान बदकाला खाल्लं.'

हा व्हिडिओ 73 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सध्या त्याचे  व्ह्यूज सतत वाढत आहेत. या पोस्टवर लोकांच्या बऱ्याच कमेंट येत आहेत. या मोठ्या मगरीची शिकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. 

एका युजरने लिहिले, "मी पहिल्यांदाच इतकी मोठी मगर पाहिली आहे." तर दुस-या युजरने लिहिले, "मगरीसमोर बदक किती लहान दिसतेय तिचं पोट कसं भरेल?"

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video viral long alligator devouring duck in lake