
लॉस एंजेलिस : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरविरोधी कारवाईदरम्यान आज हिंसाचार झाला. लॉस एंजेलिस येथे मागील तीन दिवसांपासून बेकायदा स्थलांतरितांविरोधात कारवाई सुरू असताना आज येथे तीनशेहून अधिक सैनिकांना तैनात केल्याने सामान्य नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला.