
इंडोनेशियातील एका गावातून रक्ताची नदी वाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
इंडोनेशियातील एका गावातून रक्ताची नदी वाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल होणारे फोटो धक्कादायक असून हैराण करणारे आहेत. फोटोमध्ये रक्ताची नदी वाहताना दिसत आहे. फोटो जगभर व्हायरल होत आहेत, त्यामुळे काहीतरी भयंकर घडले असल्याची शंका व्यक्त केली जात होती. पण, बातमीच्या खोलात गेल्यानंतर कळालं की, डाईंग फॅक्ट्री असलेल्या भागात पूर आला होता. फॅक्ट्रीमधील रंगासोबत पाणी मिळाल्याने नदीला लाल रंग आला होता.
ट्विटरवर हजारो लोकांनी सेंट्रल जावाच्या पेकलोंगन शहरातील एका गावातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. अनेकांना हे रक्त असल्याचा भास झाला. पेकलोंगन शहर पारंपरिक इंडोनेशियाई डाईंग तंत्रज्ञानाने तयार होणाऱ्या बाटिक उत्पादनासाठी ओळखले जाते. येथे कपड्यांवर विविध रंगाचे पॅटर्न बनवले जातात.
Uttarakhand Glacier Flood LIVE: 150 लोक वाहून गेल्याची शक्यता; मुख्यमंत्री...
इंडोनेशियातील या शहरात नदीमध्ये वेगवेगळे रंग मिसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मागील महिन्यात पुरावेळी नदीचे पाणी हिरवे झाले होते. एका ट्विटर यूजरने सांगितलं की, रस्त्यावर अनेकवेळा वेगवेगळ्या रंगाचे खड्डे दिसून येतात. पेकलोंगनचे अधिकारी डिमास अर्ग यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ खरे असल्याचं म्हटलं आहे. पण, ते रक्ताचे पाणी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंकडे पाहून चुकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या फोटोंचा चुकीच्या पद्धतीने वापर न करण्यास सांगण्यात आले आहे. अनेकांनी या फोटोंचा वापर करत हा जगाचा शेवट असल्याचं वक्तव्य केली आहे. अशा लोकांचा हेतू खोटा संदेश पसरवण्याचा असून लोकांची दिशाभूल करण्याचा आहे.