हेच बघायचं राहिलं होतं! ओमिक्रॉनला जाळून मारण्याचा चिनी प्रयोग? VIDEO VIRAL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china omicron

ओमिक्रॉनला जाळून मारण्याचा चिनी प्रयोग? VIDEO VIRAL

जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. या विषाणूची उत्पत्ती जिथून झाली, चीनही (china) त्याला अपवाद नाही. ओमिक्रॉन (omicron) या कोरोनाच्या नवीन प्रकाराचे 'काळे ढग' प्रत्येक देशावर घिरट्या घालत आहेत. हे टाळण्यासाठी काही देश बूस्टर डोस (booster dose) लागू करत आहेत तर काही लॉकडाऊनचा (lockdown) पर्याय शोधत आहेत. पण चीन ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी अतिशय विचित्र पध्दत अवलंबत आहे. जरा कल्पना करा, व्हायरस थांबवण्यासाठी ते जाळले जाऊ शकते का?

चीनमधील नागरिक अजूनही घरात कैद

चीनमध्ये लाखो लोक अजूनही घरात कैद आहेत. या भागातील नागरिक संसर्गाचा उद्रेक अनुभवत आहे. लॉकडाउन लावणारा चीन हा पहिला देश आहे जिथे करोडो लोक अजूनही त्यांच्या घरात कैद आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर चीनने 13 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील शिआन शहरात लॉकडाऊनचे आदेश दिले. कोरोनाला जाळून मारण्यासाठी चीन जो प्रकार करत आहे, याचा पुरावा ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ देत आहे. नेमका काय प्रकार आहे हा?

ओमिक्रॉनला जाळून मारण्याचा चिनी प्रयोग?

काही आरोग्य कर्मचारी कॅम्पसमध्ये फवारणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांनी पीपीई किट घातली आहे. यामध्ये एका कामगाराच्या हातात फ्लेमथ्रोवर मशीन म्हणजेच आग फेकण्याचे यंत्र आहे. ही व्यक्ती या मशीनच्या सहाय्याने हवेत ज्वाला फेकते. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की चीनमधील आरोग्य कर्मचारी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी फ्लेमथ्रोवर मशीन वापरत आहेत.

देशात कडक नियम लागू

माध्यमांनी वृत्त दिले आहे की चीनमधील सर्व रहिवाशांना घरी राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना घराबाहेर पडणे अत्यंत आवश्यक असल्याशिवाय रस्त्यावर न येण्यास सांगण्यात आले आहे. विशेष बाबी वगळता शहरात ये-जा करण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. आदेशात म्हटले आहे की प्रत्येक घरातील एका व्यक्तीला दर दोन दिवसांनी घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जात आहे.

हेही वाचा: शिवसेनेशी युती? काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर भुजबळांचं उत्तर!

नागरिकांचे अन्नावाचून हाल

चीनमधील शिआन शहरात कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. लॉकडाऊनमध्ये करण्यात येत असलेल्या अनावश्यक कडकपणामुळे त्यांच्याकडे खायला अन्न शिल्लक नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्याचवेळी लोकांना पुरेसा अन्न पुरवठा केला जात असल्याचा दावा चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे. या शहरात गेल्या नऊ दिवसांपासून एक कोटी ३० लाख लोक घरात कैद आहेत.

हेही वाचा: देशात दिवसभरात १.६८ लाख नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top