Hathras Stampede: व्लादिमीर पुतीन यांनी हाथरस घटनेवर व्यक्त केला शोक, राष्ट्रपती मुर्मू अन् PM मोदींना लिहिले पत्र

Vladimir Putin : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे
Vladimir Putin
Vladimir Putin esakal

हाथरस चेंगाचेंगरी प्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांत्वन संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पुतिन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "या दुःखद घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही भारताच्या जनता आणि सरकाराशी सहवेदना व्यक्त करतो."

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक संवेदना पाठवल्या आहेत. भारतातील रशियन दूतावासाने सोशल मीडिया एक्सवर याबद्दल पोस्ट केली आहे.

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर प्रदेशातील या चेंगाचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि शोकाकुल कुटुंबीयांना आधार दिला. त्यांनी जखमींच्या त्वरित बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

Vladimir Putin
Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

या सत्संगाचे आयोजन 'भोले बाबा' उर्फ बाबा नारायण हरि यांच्या संघटनेने केले होते. या कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांमधून भक्त आले होते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात लहान मुले आणि 100 हून अधिक महिलांचा समावेश आहे. हे भक्त उत्तर प्रदेशासह हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील होते. उत्तर प्रदेशातील हाथरस, बदायू, कासगंज, अलीगढ़, एटा, ललितपुर, फैजाबाद आणि आगरा जिल्ह्यातील नागरिक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.

Vladimir Putin
Zika virus: काळजी घ्या! महाराष्ट्रातील झिका व्हायरस प्रकरणांवर केंद्राने राज्यांना काय दिला महत्वाचा सल्ला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com