
मॉस्को : दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी कुर्स्क या रशियन प्रदेशात अडचणीत असलेल्या युक्रेनच्या लष्कराला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुतिन हे युद्धबंदीच्या वाटाघाटींआधीच त्या फिसकटविण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला.