
नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात
Wife Advertisement In Thailand लग्न आणि नात्याची अनेक विचित्र प्रकरणे जगभरातून समोर येतात. कधी-कधी अशी घटना समोर येते की पती-पत्नीमध्ये तिसरा व्यक्ती येतो. यामुळे खुनाचीही घटना घडते. परंतु, पत्नी स्वतः पतीसाठी मुलगी शोधत असल्याच्या बातमीवर तुम्ही विश्वास करणार नाही. मात्र, हे खरं आहे. पत्नी पतीसाठी मुलगी शोधत असून, तीन मुलींची मागणी केली आहे. तसेच एक जाहिरातही (Advertisement) काढली आहे.
थायलंडमध्ये (Thailand) राहणाऱ्या महिलेचे नाव पत्थीमा आहे. तिने पतीसाठी तीन मुलींची गरज असल्याची जाहिराती (Advertisement) दिली आहे. या जाहिरातीत तिने कोणत्या प्रकारची मुलगी हवी आहे हे देखील सांगितले. तिने ही जाहिरात का काढली हे देखील सांगितले आहे. तिला पतीसाठी एक मुलगी भेटली पण आहे. आता दोन मुलींची गरज आहे.
हेही वाचा: फडणवीसांप्रमाणेच भाजप पुन्हा आश्चर्यचकित करणार; ‘या’ दोन नावांचा समावेश
महिलेला अनेक आजार आहे. त्यामुळे ती पतीची काळजी घेऊ शकत नाही. मी माझ्या पतीला जिच्याशी वाटेल तिच्यासोबत राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मी त्यांना यात मदत करीत आहे. ती अशा महिलांच्या शोधात आहेत ज्या तिच्या पतीला आनंदी ठेवू शकेल. त्यांच्या कामातही मदत करू शकतील. त्या बदल्यात मुलींनाही महिन्याला पैसे दिले जातील, असे मुली शोधणाऱ्या पत्नीने सांगितले.
या महिलेने तिच्या सोशल मीडियावर जाहिरात दिली आहे. अर्ज करणाऱ्या महिलांची एचआयव्ही चाचणी आवश्यक असल्याचे महिलेने लिहिले आहे. मुलगी ३० ते ३५ वर्षांची असावी. तिच्याकडे हायस्कूल किंवा बॅचलर पदवी असावी. महिलांचे राहणे व जेवणही मोफत असेल. सध्या महिलेची जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
Web Title: Want Three Girls For Husband Wife Advertisement Thailand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..