
वॉशिंग्टन डीसीमध्ये एक भयंकर अपघात झाला असून प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात हवेतच टक्कर होऊन ६७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोटोमॅक नदीतून आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोधमोहीम वेगाने सुरू आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवासी जेटमध्ये ६० प्रवासी आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते.