Arati Prabhakar : ‘एआय’मध्ये भारतासारख्या देशांबरोबर काम करु

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात अमेरिका व भारतासारख्या समविचारी देशांबरोबर एकत्र काम करण्याची गरज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वैज्ञानिक सल्लागार आरती प्रभाकर यांनी व्यक्त केली.
arati prabhakar
arati prabhakarsakal

वॉशिंग्टन - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात अमेरिका व भारतासारख्या समविचारी देशांबरोबर एकत्र काम करण्याची गरज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वैज्ञानिक सल्लागार आरती प्रभाकर यांनी व्यक्त केली.

‘एआय’ तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ देऊ नये व सार्वजनिक हितासाठी वापरला होत आहे, याची खात्री गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या अन्य आयटी कंपन्यांबरोबर करण्याचा प्रयत्न अमेरिकेचे प्रशासन करीत आहे. यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी सरकारबरोबर काल चर्चा केली. भारतीय वंशाच्या अमेरिकी अधिकारी प्रभाकर म्हणाल्या, ‘‘या मुद्द्यावर कंपन्यांना जबाबदार ठरविता यावे, यादृष्टीने आम्ही काम करीत असून यात थोडी प्रगती झाली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कार्यवाही करण्यासंदर्भातही काम सुरू आहे. ‘एआय’चे धोके आणि चांगल्या कामासाठी त्याचा वापर करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कायदा करण्याच्या विचारात अध्यक्ष आहेत.

‘हे जागतिक तंत्रज्ञानाचे युग आहे आणि तंत्रज्ञान सर्वत्र आहे. सर्व लोकांचा याच्याशी संबंध आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर तंत्रज्ञानाचा प्रभाव पडत असतो. अशा वेळी भारतासह समविचारी देशांबरोबर संयुक्तपणे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा अमेरिकेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असता अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्यामध्ये या तंत्रज्ञानासंबंधी चर्चा झाली आहे,’’ असे आरती प्रभाकर यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावर अमेरिकेने काल गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा व अन्य काहा छोट्या ‘एआय’ कंपन्यांच्या प्रतिनिधींबद्दल चर्चा केली.

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणूक करणे सोपे झाले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून ते वाढत जातील. या तंत्रज्ञानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि होणाऱ्या फायद्यांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहे. सध्याच्या काळात ‘एआय’हे सर्वांत बलाढ्य तंत्रज्ञान आहे.

- आरती प्रभाकर, वैज्ञानिक सल्लागार, अमेरिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com