डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग भेटीसाठी अमेरिकेची पूर्वअट

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

ठोस कृतीशिवाय भेट अशक्‍य

वॉशिंग्टन: उत्तर कोरियाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांसंदर्भात प्रत्यक्षात ठोस कृती केली जात नाही तोपर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यातील भेट प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, अशी माहिती "व्हाइट हाउस'कडून आज देण्यात आली.

किम यांना भेटण्यास आपण तयार असल्याचे "ट्‌विटर'वर जाहीर करून ट्रम्प यांनी जगाला धक्का दिला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी "व्हाइट हाउस'कडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले असून, उत्तर कोरियाकडून ठोस कृती केली जात नाही तोपर्यंत ट्रम्प आणि किम भेट प्रत्यक्षात येऊ शकणार नाही.

ट्रम्प आणि किम यांच्यातील भेटीची वेळ आणि स्थळ अद्याप ठरविण्यात आलेले नाही, असेही "व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव सारा सॅंडर्स यांनी सांगितले. दरम्यान, किम यांच्याबरोबरच्या भेटीस तयारी दर्शविल्यानंतर या घडामोडींबाबत ट्रम्प यांनी जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे सॅंडर्स यांनी सांगितले. अण्विक कार्यक्रम बंद करण्यासाठी अमेरिकेकडून उत्तर कोरियावर जोरदार दबाव टाकला जात आहे, असे सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news usa donald trump north korea kim jong un