Washington Post : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या धोरणामध्ये बदल
New York : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या संपादकीय धोरणात मोठा बदल करत वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठेच्या समर्थनाचा निर्णय घेतला आहे. मालक जेफ बेझोस यांच्या घोषणेमुळे माध्यम वर्तुळात खळबळ उडाली आहे.
न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वर्तमानपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने संपादकीय धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येथून पुढे हे वर्तमानपत्र वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठेच्या धोरणाचा पुरस्कार करणार आहे.