पाकिस्तानात सगळ्याच नद्यांना पूर; १००० हून अधिक मृत्यू, आणीबाणी घोषित

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतातील स्थिती चिंताजनक
Weather update Rain forecast death 900 National emergency imposed in Pakistan
Weather update Rain forecast death 900 National emergency imposed in Pakistansakal
Updated on

इस्लामाबाद : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतातील स्थिती चिंताजनक बनली आहे. देशभरात आतापर्यंत १००० हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. हवामान खात्याने आणखी मुसळधारेचा अंदाज वर्तविला आहे. बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत पावसाचे २३४ बळी गेले आहेत. खैबर पख्तुनख्वा येथे १८५ आणि पंजाब प्रांतात १६५ जणांचा मृत्यू झाला. गिलगिट बाल्टिस्तान येथे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची ढासळती स्थिती पाहता राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालात म्हटले, की चौदा जूननंतर आतापर्यंत सिंध प्रांतात ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘डॉन’ने म्हटले की, मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला असून आतापर्यंत ९३७ जणांचे बळी गेले आहेत. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यांत २४१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या ठिकाणी सरासरी १६६.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. दरवर्षी सरासरी ४८ मिलिमीटर पावसाची नोंद असताना यंदा पावसाने विक्रम केला आहे. सिंध प्रांतातील २३ जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा दिला.

पाकच्या सैनिकांना पाचारण

हवामान बदल खात्याचे मंत्री शेरी रेहमान यांनी सांगितले की, पाकिस्तानचे सैनिक आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्यात वेगाने काम करत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. देशभरात सुमारे तीन कोटीपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. काही छावण्यांमध्ये लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेकडो लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. बलुचिस्तान प्रांतातील बेघर लोकांसाठी सुमारे एक लाख छावण्यांची मागणी केली आहे. पूरग्रस्तांना होणारी मदत अपुरी पडत असल्याने पाकिस्तान सरकारने अन्य देशांकडून मदत मागितली आहे.

पाकिस्तान सरकारला सध्या ५.७८ लाख कोटी रुपयांची गरज आहे. तसेच आरोग्य खात्याला १२.९ हजार कोटी रुपये हवे आहेत. तसेच पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारला ९ अब्ज रुपये म्हणजेच भारतीय चलनात ७२.०८ हजार कोटी रुपये हवे आहेत. पावसामुळे कारखान्यांचे नुकसान झाले आहे. त्याच्या भरपाईसाठी ४.६४ अब्ज रुपये (३७.०७ हजार कोटी रुपये) हवेत.

८२ हजार घरांची हानी

माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी म्हटले, की पुरामुळे ८२ हजार घरांची हानी झाली आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी सुमारे ४१ अब्ज रुपये (३.२७ लाख कोटी भारतीय रुपये) खर्च येणार आहे. म्हणजेच प्रत्येक घराला ५० हजार रुपये लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com