काय आहेत अफगाणिस्तानील ४ दशकांतल्या ठळक घडामोडी

afghanistan
afghanistansakal
Updated on

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांची देशवापसी सुरू झाल्यानंतर तालिबानने एकामागून एक प्रांत काबीज केले आणि रविवारी काबूलवर धडक मारली. एवढेच नाही तर अध्यक्षीय प्रासादावरही ताबा मिळवला. अफगाणिस्तानात आज उद्भवलेली परिस्थिती ही काही अचानक निर्माण झालेली नाहीये. गेली चार दशके तिथे अस्थिरता ही एकमेव गोष्ट स्थिरपणे नांदत आहे. गेल्या चार दशकात नेमकं काय काय घडलं हे आपण समजून घेऊयात...

१९७९-१९८९ : सोव्हिएत रशियाकडून कब्जा

- कम्युनिस्ट राजवटीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने रशियन सैन्याचा डिसेंबर

१९७९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये शिरकाव

- पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याच्या जोरावर मुजाहिदीन बंडखोरांकडून प्रतिकार

- एका दशकानंतर १९८९ मध्ये रशियन सैन्याची माघार

१९९२ ते १९९६ : यादवी युद्ध

- पाकिस्तानच्या पाठिंब्याच्या जोरावर तालिबान चळवळीचा उदय

- दोन वर्षांच्याच कालावधीत सुमारे एक लाख व्यक्ती मारल्या गेल्या

१९९६ ते २००१ : तालिबानी राजवट

- कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेकडून सत्ता काबीज

- मुल्ला महंमद उमर याच्या नेतृत्वाखालील तालिबानचा अल््-कायदाशी घनिष्ठ संबंध

- अल्-कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेन याला आश्रय

२००१ : पाश्चिमात्य देशांचा हस्तक्षेप

- अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांकडून ताबिलानी सरकार उलथवून टाकले

- हमीद कर्झाई यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना

- तालिबानचा प्रतिकार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने एक लाख ३० हजार सैनिक तैनात

afghanistan
अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई संकुलात परतण्यास परवानगी

२००४ ते २०१४

- पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत कर्झाई यांची जागतिक पाठिंब्याच्या जोरावर सरशी

- २००९ मधील निवडणुकीत फेरनिवड, मात्र या निवडीस प्रचंड गैरप्रकार, नीचांकी मतदान आणि तालिबानच्या हिंसाचाराचे गालबोट

२०१४ ते २०१६ : अमेरिकेची माघार

- नाटोकडून अफगाणिस्तानचे लष्कर आणि पोलिस यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था हवाली

- अमेरिका आणि नाटो यांचे काही सैन्य कायम ठेवण्याच्या करारावर नवे अध्यक्ष अश्रफ घनी यांची स्वाक्षरी

- सुरक्षा व्यवस्था खालावण्यास प्रारंभ

- जून २०१६ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी

२०१७ : अमेरिकेचे सैन्य भक्कम

- अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियोजित माघार प्रक्रिया रद्द, दुसरीकडे हजारो सैनिक पाठवून सुरक्षेची ग्वाही भक्कम

- अफगाण सैन्यावरील हल्ल्यांत वाढ, दुसरीकडे अमेरिकेकडून हवाई हल्ले तीव्र

२०२० : अमेरिका-तालिबान करार

- २०१८ मध्ये सुरु झालेल्या वाटाघाटींना पुढे सुरु

- परदेशी सैन्याच्या माघारीवर तालिबान-अमेरिका करार

२०२१

- अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून सैन्य माघारीची तारीख ११ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय

- मे महिन्यात नाटो सैन्य माघारीचा अखेरचा टप्पा सुरु होत असताना तालिबानकडून मे महिन्यात हिंसाचारत वाढ, अनेक जिल्हे आणि सीमेवरील चौक्यांवर ताबा

- ऑगस्टमध्ये राजधानी काबूल ताब्यात

- १५ ऑगस्ट रोजी अध्यक्ष अश्रफ घनी यांचे ताजिकिस्तानला पलायन, तालिबानचा पूर्ण देशावर कब्जा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.