Lok Sabha election: लोकसभेच्या निकालाबाबत जगाला काय वाटतं? पाकिस्तान, तुर्की, ब्रिटनसारख्या देशांची प्रतिक्रिया काय?

Lok Sabha election Result World View: जगातील अनेक देश भारतातील निकालाकडे बारीक लक्ष ठेवून होते. या देशातील मीडियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया.
narendra modi rahul gandhi
narendra modi rahul gandhi

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला आहे. यात भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. निकालाकडे देशाचं लक्ष लागलंच होतं, पण जगातील अनेक देश भारतातील निकालाकडे बारीक लक्ष ठेवून होते. या देशातील मीडियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया.

पाकिस्तानने काय म्हटलंय?

पाकिस्तानच्या प्रमुख 'डॉन' वृत्तपत्राने आपल्या एका बातमीच्या टायटलमध्ये म्हटलंय की, मोदींच्या युतीने बढत घेतली आहे, पण विरोधकांनी सर्व अंदाज चुकवले आहेत. पाकिस्तानच्या आणखी एका वृत्तपत्राने म्हटलं की, २०१९ च्या तुलनेत एनडीएला २०२४ मध्ये कमी जागा मिळाल्या आहेत.

narendra modi rahul gandhi
Lok Sabha Election Result 2024: ...तर भाजपची झाली असती नाचक्की; आकडा आला असता दोनशेच्या खाली

कतार

कतारचे आंतरराष्ट्रीय चॅनल अलजझीराने मतदानासंदर्भात लाईव्ह बॉग सुरु केला होता. मोदींची भाजप बहुमतापासून दूर राहील, असं त्यात म्हणण्यात आलं होतं. अलजझीरामध्ये लिहिण्यात आलं होतं की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार बनवताना दिसत आहे. पण, भाजपला एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन करता येणार नाही. विरोधकांनी चांगली मजल मारली आहे. एक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलं होतं की, एनडीए प्रचंड मतांनी विजयी होईल. पण, विरोधकांनी चांगली कामगिरी करत मुसंडी मारली आहे, असं कतारच्या न्यूज संस्थेने म्हटलं.

संयुक्त अरब अमिराती

युएईच्या खलीज टाईम्सने निकालावेळी म्हटलं की, मताच्या आकड्यांनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील पक्ष पुढे आहे, पण एक्झिट पोलमध्ये जसा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तसा निकाल नाही.

narendra modi rahul gandhi
Lok Sabha Election Result 2024 : ‘लोकसभा निवडणुकीचा ‘निकाल परिवर्तनाला पोषक’ - शरद पवार

तुर्की

तुर्कीचे सरकारी ब्रॉडकास्टर टीआरटी वर्ल्डमध्ये लिहिण्यात आलंय की, भाजपला विरोधी पक्षांच्या आघाडीने कडवी टक्कर दिली आहे. पंतप्रधान मोदी यांची हिंदू राष्ट्रवादी पक्ष पुढे आहे, पण विरोधकांच्या आघाडीने चांगली टक्कर दिली. मात्र, तिसऱ्या विजयामुळे मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाचे नेते म्हणून स्थापित होतील.

ब्रिटन

ब्रिटनच्या 'द गार्डियन'मध्ये लिहिण्यात आलंय की, पंतप्रधान मोदी यांचा पक्ष विजयाच्या दिशेने आगेकुच करत आहे. पण, मोठा विजय प्राप्त करण्यापासून दूर राहात आहे. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले आहेत. मात्र, सरकार स्थापन करण्याइतके मोदी यांच्याकडे जागा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com