इसवी सन म्हणजे काय?

What is Mean by Before Christ or Before the Common
What is Mean by Before Christ or Before the Common

इतिहासातील घटना किंवा नोंदींमध्ये 'इसवी सन' हा शब्द आपण हमखास ऐकतो किंवा वाचतो. त्यात कधी 'इसवी सन', तर कधी 'इसवी सनपूर्व' हे आपल्या वाचण्यात नक्की येतच. मग, इसवी सन म्हणजे काय बरं! असा प्रश्न अनेकांना पडतो. इसवी सन कधीपासून सुरू झालं, इसवी सन व इसवी सनापूर्वीचा काळ यांच्यात नेमका फरक काय? तो कसा मोजतात, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे हा संपूर्ण लेख जरूर वाचा. (What is Mean by Before Christ or Before the Common)

इसवी सन म्हणजे काय? What is AD?

इसवी सन किंवा इसवी ही ग्रेगोरियन कॅलेंडरमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. अरबी भाषेतील 'इसा' (येशू) या शब्दापासून 'इसवी' हा शब्द तयार झाला आहे. 'सन' म्हणजे वर्ष किंवा साल. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या घटना काळाला 'इसा पूर्व', 'इसवी पूर्व' किंवा इ.स.पू. (इसवी सन पूर्व) असे म्हटले जाते. हजारो‌ वर्षांचा काळ सोप्या पद्धतीने मोजता यावा, यासाठी प्रभू येशूच्या जन्माच्या घटनेला आधारभूत मानलं जातं. त्यानुसार इतिहासातला काळ दोन‌ भागांत विभागला जातो. येशूच्या जन्मापूर्वीचा काळ हा 'ख्रिस्तपूर्व', तर येशूच्या जन्मानंतरचा काळ हा 'एनो डोमीनी' या उपनामांनी ओळखला जातो. एनो डोमीनी हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ 'प्रभूचं वर्ष' असा होतो. अनेक देशांत ख्रिस्तपूर्व काळाला 'बीसीई' (Before Common Era) आणि ख्रिस्त जन्मानंतरच्या काळाला 'सीई' (Common Era) ही उपनामं लावली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com