अमेरिकेत गोंधळ! विमान उड्डाणं नियंत्रित करणारी 'NOTAM' काय आहे? जाणून घ्या

what is notam notice to air mission system which malfunctioning effect air travels in America
what is notam notice to air mission system which malfunctioning effect air travels in America

NOTAM System Failure : अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या नोटिस टू एअर मिशन सिस्टम (NOTAM) मध्ये अडथळे आल्याने हवाई सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे अमेरिकेत शेकडो विमान उड्डाणे उशीराने झाली.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणते की एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम कमांड सेंटरच्या एडवायजरीमुळे NOTAM एरर आला. विशेषज्ञ सध्या ते दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच नोटीस टू एअर मिशन सिस्टममध्ये बिघाड झाला आहे.

NOTAM काय आहे?

नोटीस टू एअर मिशन सिस्टीम (Notice to Air Mission System) ही एक प्रकारची कम्युनिकेशन सिस्टीम आहे, ज्याच्या मदतीने फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या केबिन क्रूच्या लोकांना महत्वाची माहिती पाठवली जाते.

ही एक अतिशय गुप्त माहिती प्रणाली आहे, जी हॅक करणे खूप कठीण आहे. नोटिस टू एअर मिशन सिस्टम अंतर्गत, हवामान, ज्वालामुखीचा उद्रेक, हवाई क्षेत्रावरील निर्बंध, पॅराशूट जंप, रॉकेट लाँ आणि लष्करी सराव यांसारखी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती विमानाच्या पायलटला पाठविली जाते. जेणेकरून विमान प्रवासादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागणार नाही.

what is notam notice to air mission system which malfunctioning effect air travels in America
Dasun Shanaka Run Out : नाट्य शेवटच्या षटकातलं…. रोहित होता म्हणून शानकाचं झालं शतक

तसेच, या माहिती प्रणालीद्वारे, विमानाच्या पायलटला विमानतळांची स्थिती जसे की बर्फवृष्टी, लाइटमध्ये खरावी किंवा धावपट्टीवर पक्षी असल्याबद्दल माहिती दिली जाते. असे म्हणता येईल की विमानाच्या सुरक्षित प्रवासासाठी नोटीस टू एअर मिशन सिस्टम खूप महत्वाचे आहे.

ट्विटरवर माहिती देताना, यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने सांगितले की 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन नोटिस टू एअर मिशन सिस्टम पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहे. काही फंक्शन्सनी काम करणे सुरू केले आहे, राष्ट्रीय एअरस्पेसमधील ऑपरेशन्स मर्यादित असतील.

what is notam notice to air mission system which malfunctioning effect air travels in America
Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतून आणि बाहेरून अमेरिकेत येणारी 760 हून अधिक उड्डाणे उशीराने होत आहेत. तसेच 91 विविध उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. युनायटेड एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की सर्व देशांतर्गत उड्डाणे उशीराने होत आहेत आणि एफएएला कळताच या मुद्द्यावर अपडेट केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com