जिम सायकलवर व्यायाम करतच केलं जातंय गहू दळण, हा अजब गजब जुगाड पाहाच

viral video
viral video

इतर देशांमधील काही माहित नाही, परंतु भारताने जुगाड करण्यामध्ये प्रभुत्व मिळवले हे मात्र खरं आहे. कारण नेहमीच बऱ्याच गोष्टी जुगाडच्या जोरावर केल्या जात आहेत. जगात देसी जुगाडपेक्षा दुसरे काहीच चांगले नाही असे काहीजण बोलतात. कोरोना काळात वातावरण बदलले असल्यामुळे काही लोकांची कामे बंद झाली आहेत. तर दुसरीकडे एका पेक्षा एक जुगाड केलेले पाहावयास मिळत आहे. त्याच पद्धतीने देसी जुगाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एक महिला जिम सायकल चालवतच गहू दळत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर हा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अवनीश यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गजब का आविष्‍कार', काम और कसरत भी. कॉमेंट्री भी शानदार.'

या व्हिडिओच्या सुरूवातीस एक महिला दुचाकी सायकल चालवत आहे. ही सायकल सामान्य सायकल नसून जिम सायकल आहे. ज्या महिलेने व्हिडिओ शुट केलं आहे, त्या महिलेने सुरवातीला या सायकलबद्दल माहिती सांगत आहे. घरीच गहू कसे दळता येऊ शकते हे सुद्धा सांगितले. यावेळी ती महिला म्हणाली, 'ही एक छोटी जिम आहे, जी तुम्ही घरी बसूनसुद्धा वर्कआउट करू शकता. तसेच ही कसरत शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुम्हाला व्यायाम करता येईल, वजन कमी करता येईल आणि घरामध्येच गहू दळून घेणे सोईस्कर होईल. पीठ तयार झाल्यावर तुम्हाला ताज्या पोळ्याही (चपाती) तयार करता येतील. कोणीही हे काम अगदी आरामात करू शकेल. 

ही सायकल खूप खास आहे

या जिम सायकलमध्ये एका बाजूला धान्य ठेवण्यासाठी पिठाच्या गिरणीसारखी सिस्टीम केली आहे. सायकलचे पायडल मारल्यावर गिरणी सुरु होते आणि गहू दळणे सुरू होते. गव्हासाठी एक भांडे देखील ठेवले आहे, ज्यामध्ये पीठ पडत आहे. हाच अजब गजब व्हिडिओ पाहिल्यावर समजत की, एकावेळी दोन काम करता येऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com