
वॉशिंग्टन : ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामबद्दलचा भयगंड) दूर करण्यासाठी व्हाइट हाउसच्या वतीने पहिल्यांदाच राष्ट्रीय धोरण आखण्यात आले आहे. मुस्लिमांबाबतचा द्वेष, त्यांच्याविरोधात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना आणि त्यांच्याबाबत घडणारा भेदभाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय प्रशासनाकडून तब्बल शंभर कलमी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.