Corona: कोरोना काळात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेकडून भारताचं कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona: कोरोना काळात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेकडून भारताचं कौतुक

Corona: कोरोना काळात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेकडून भारताचं कौतुक

White House on india: गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जग थांबलेच होते. कोरोना रोखण्यासाठी त्यावर लस निर्माण करण्यासाठी जगात जणू स्पर्धा निर्माण झाली होती. मात्र, जगभरातून प्रयत्न सुरू असतानाच भारताने बाजी मारली आणि लस निर्माण केली.जगातून भारताचं कौतुक झालंच पण अशातच आता अमेरिकेकडूनही जाहीर कौतुक केलं आहे.

जागतिक स्तरावर कोरोनाच्या लसींचा पुरवठा करण्यामध्ये भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असं म्हणत अमेरिकेकडून भारताचं कौतुक करण्यात आलं आहे. भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक देश आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. व्हाईट हाऊसने जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यामध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मान्य करत भारताचं कौतुकही केलं आहे.

व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे, जागतिक स्तरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे भारत जागतिक पातळीवर कोरोना लसींचा प्रमुख निर्यातदार ठरला आहे.