WHO कडून भारतातील 10 लाख आशाताईंचा सन्मान; कोविड काळातील सेवेची घेतली दखल

जागतिक आरोग्य सेवेसाठी या आशाताईंनी 'उत्कृष्ट' काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आल आहे.
asha workers
asha workers

जिनिव्हा : कोविड काळात आरोग्य सेवेत आपलं अमुल्य योगदान दिल्याबद्दल भारतातील १० लाख आशाताईंचा जागतीक आरोग्य संघटनेकडून गौरव करण्यात आलं आहे. जागतीक आरोग्य सेवेत उत्कृष्ट योगदान, नेतृत्व आणि वचनबद्धता या आशाताईंमधील गुणांची WHOनं दखल घेतली आहे. आशाताई या भारतातील मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या आहेत. ज्या ग्रामीण भागात मानधन तत्वावर आरोग्य स्वयंसेवक म्हणून काम करतात. (WHO honors 10 lakh Asha tai in India Notice her service in covid pandemic period)

भारतातील १० लाखांहून अधिक आशा स्वयंसेविका आहेत. आरोग्य व्यवस्थेशी जोडण्यात आणि ग्रामीण भागातील गरिब जनतेला कोविड महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य सेवा मिळू शकतील याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना जागतीक आरोग्य संघटनेकडून अर्थात WHOकडून सन्मानित करण्यात आले आहे.

आशाताई लस-प्रतिबंधित रोगांपासून लहान मुलांची आणि त्यांच्या मातांची काळजी घेणं तसेच त्यांचं लसीकरण करण्याचं काम या आशाताई करतात. समुदायिक आरोग्य सेवा, उच्च रक्तदाब आणि क्षयरोग उपचार तसेच पोषण, स्वच्छता आणि निरोगी जीवनासाठी आरोग्य संवर्धनाच्या मुख्य क्षेत्रांमध्ये त्या काम करतात असं WHO ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

आशा कार्यकर्त्यांचे कौतुक करताना WHOच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग म्हणाल्या, "आशा या आरोग्याच्या खऱ्या चॅम्पियन आहेत ज्या प्राथमिक आरोग्य सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. त्यांचे कार्य नेहमीच अनुकरणीय राहिले आहे, विशेषत: महामारीच्या काळात. या सर्व आशाताईंना खऱ्या अर्थाने योग्य दखल घेतल्याबद्दल मी या दहा लाखांहून अधिक सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते"

75 व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वाटप झाले. 2019 मध्ये हा विशेष पुरस्कार सुरु करण्यात आल आहे. या सोहळ्यात WHOचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी सहा ग्लोबल हेल्थ लीडर्स पुरस्कार जाहीर केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड्ससाठी डॉ. टेड्रोस स्वतः पुरस्कार विजेते ठरवतात.

यावेळी डॉ. घेब्रेयसस म्हणाले, "ज्या वेळी जग विषमता, संघर्ष, अन्न असुरक्षा, हवामान संकट आणि महामारीच्या अभूतपूर्व अभिसरणाचा सामना करत आहे, अशावेळी जगभरातील आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना याद्वारे आम्ही सन्मानित करतो," आजीवन समर्पण, समानतेची वचनबद्धता आणि मानवतेची निःस्वार्थ सेवा यांसाठी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com