PM मोदींचे चरणस्पर्श करणारे पंतप्रधान जेम्स मारापे आहेत तरी कोण?

पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी या देशाने आपली जुनी परंपरा मोडली.
(Who is James Marape touched PM Modi feet Papua New Guinea
(Who is James Marape touched PM Modi feet Papua New Guinea

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले होते. यावेळी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे आज (२० मे) स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदींनीही लगेच मारापे यांची गळाभेट घेतली. तर चरणस्पर्श केलेले जेम्स मारापे आहेत तरी कोण?(Who is James Marape touched PM Modi feet Papua New Guinea)

पापुआ न्यू गिनीमध्ये असा नियम आहे की सूर्यास्तानंतर आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही, परंतु पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी या देशाने आपली जुनी परंपरा मोडली आहे. (Marathi Tajya Batmya)

(Who is James Marape touched PM Modi feet Papua New Guinea
PM Modi in Papua New Guinea : ...तर संयुक्‍त राष्ट्रे ठरतील ‘गप्पांची दुकाने’

जेम्स मारापे हे 2019 पासून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत आणि ते पंगू पाती राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. मारापे यांचा जन्म हेला प्रांतातील तारी येथे 1971 मध्ये झाला. त्यांनी पीएनजी हायलँड्समधील मिंज प्रायमरी स्कूल आणि काबिउफा अॅडव्हेंटिस्ट सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

(Who is James Marape touched PM Modi feet Papua New Guinea
Narendra Modi : मोदींची जगात हवा! पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पडल्या पाया...

जेम्स मारापे यांनी 1993 मध्ये पापुआ न्यू गिनी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. जेम्स मॅरापे यांच्याकडे पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील आहे. (Marathi Tajya Batmya)

मारापे हे पापुआ न्यू गिनीचे 8 वे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी यापूर्वी सरकारांमध्ये महत्त्वाची मंत्रिमंडळ पदेही भूषवली आहेत. मारापे यांनी संसदीय सचिव म्हणूनही काम केले आहे. मारापे यांनी २०१९ मध्ये पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन पंगू पक्षात प्रवेश केला.

52 वर्षीय मरापे यांनी पहिल्यांदाच आपली परंपरा मोडली आहे. जगातील इतर कोणत्याही नेत्यासाठी त्यांनी असे केले नाही.(Marathi Tajya Batmya)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com