esakal | कोरोनाबाबत WHO चे मोठं वक्तव्य; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Tedros

तरुणांनाही धोका

- लस येण्यास लागेल एक वर्ष

कोरोनाबाबत WHO चे मोठं वक्तव्य; म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस : कोरोनावर लस निर्मितीसाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत आपण कोरोनासह जगायला शिकले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले. तसेच जर तरुणांना वाटत असेल त्यांना कोरोना व्हायरसचा कोणताही धोका नसेल तर हे चुकीचे आहे. तरुणांनाही याचा धोका आहे, असे WHO चे प्रमुख टेड्रॉस अडहॉनम गीब्रीएसुस यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

टेड्रॉस यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, जर तरुणांना वाटत असेल त्यांना कोरोना व्हायरसचा कोणताही धोका नाही तर ते चुकीचे नाही. त्यांनाही कोरोनाचा धोका आहे. तरुणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू होता. तसेच ते कमजोर लोकांपर्यंत हा व्हायरस पसरविण्याचे काम करत आहेत. कोरोना व्हायरसवर लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. पण त्याच्या निर्मितीला वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्याला या व्हायरससोबत जगायला शिकले पाहिजे. 

तरुणांनाही धोका

जर आपणाला वाटत असेल तरूणांना कोरोना व्हायरसचा धोका नसेल तर हे सत्य नाही. कोरोना व्हायरसचा धोका तरुणांनाही आहे. मात्र, अनेक देश कोरोनाचा संसर्ग सामान्य संसर्ग असल्याचे मानत आहे. तरुणपीढीही कोरोनाच्या विळख्यात येऊ शकते. त्यांचाही कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यांच्यामुळे दुसऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेवरही लक्ष द्यायला हवे.

तसेच जगभरात लोकांना मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करायला हवे. डब्ल्यूएचओने अमेरिका, ब्राझील, भारत, साऊथ आफ्रिका आणि कोलंबिया या देशात बिघडत्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. 

लस येण्यास लागेल एक वर्ष

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची बनवलेली लस कितीपत प्रभावी ठरेल हे समजण्यास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियो यांनी सांगितले, की या व्हायरसचे धोका मोठा आहे. यापासून वाचण्यासाठी लसीचा एक डोस पुरेसा आहे की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा