कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपाचारासाठी WHOकडून स्वस्त औषधाची शिफारस

टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

या संशोधनाचा आधार घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर स्टेरॉयडचा प्रयोग करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगातील शास्त्रज्ञांनी मांडलेल्या संशोधनानंतर स्टेरॉयड (steroids) कोविड-19च्या गंभीर रुग्णाचाही जीव वाचवता येऊ शकत असल्याचे समोर आले आहे. या संशोधनाचा आधार घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर स्टेरॉयडचा प्रयोग करण्याची शिफारस केली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जूनमध्ये अनेक रुग्णालयांत ट्रायल चालू होती. त्यावेळी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात कोविड-19 संक्रमित आठ लोकांपैकी एकाला व्हेंटिलेटरची गरज होती. त्यानंतर त्या रुग्णाला डेक्सामेथासोन (Dexamethasone) नावाच्या स्टेरॉयडचा प्रयोग करुन वाचविण्यात आले होते. द गार्डियन (The Guardian)ने दिलेल्या एका अहवालानुसार, स्टेरॉयडचा प्रयोग त्यानंतर सहा लोकांवर करण्यात आला आणि मिळालेल्या परिणामांनुसार स्टेरॉयड हाइड्रोकार्टिसोन (Hydrocortisone) कोरोनापासून गंभीर रुग्णांचाही जीव वाचवू शकते हे समोर आले आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या एका नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या, एक विश्लेषणानुसार गंभीर असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. जोनाथन स्टर्न, ब्रिस्टल विश्वविद्यालयात वैद्यकिय आणि महामारी विज्ञानाचे प्राध्यापकांनी सांगितले की, स्टेरॉयड एक स्वस्त आणि उपलब्ध असणारे औषध आहे. गंभीर रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणत करण्यात यावा. हे औषध अत्यंत प्रभावी ठरेल असे आमचे निकष आहेत'.

स्टेरॉयड एक मोठे यश
स्टेरॉयडचे परिणाम हे कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत परिणामकारक असल्याने कोरोना व्हायरस लढाईविरोधात हे एक मोठे यश असल्याचे मानले जात आहे. स्टेरॉयडचे परिणाम हे कुठल्याही वयोगटातील रुग्णांवर होत असल्याने तसेच अतिगंभीर स्वरुपाततील रुग्णांवरही स्टेरॉयडमुळे उपचार करता येणे शक्य असल्याने कोरोनाच्या लढाईतील ही यशस्वी वाटचाल असल्याचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHOs Strong Recommendation For Steroid Use On Critical Covid Patients

टॉपिकस
Topic Tags: