Google ला दंडाचा दणका; दबावामुळे बंद केली भारतातली 'ही' सेवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

read 10 interesting stories about google on its 21st birthday

Google ला दंडाचा दणका; दबावामुळे बंद केली भारतातली 'ही' सेवा!

गुगलने भारतीय डेव्हलपर्सला लागू करण्यात आलेली गुगल प्ले बिलींग सिस्टीम पॉलिसी सध्या बंद केली आहे. ३१ ऑक्टोबरपासून गुगल हे धोरण लागू करण्याच्या तयारीत होतं. पण भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ने दिलेल्या आदेशानंतर गुगलने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयोगाने दोन वेळा गुगलला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला होता.

काय आहे हे पेमेंट धोरण?

गुगलच्या या पेमेंट धोरणानुसार, अॅप डेव्हलपर्सने त्यांच्या अॅपमधून पेमेंट करण्यासाठी गुगल प्ले बिलींग सिस्टीम वापरणं बंधनकारक असेल. याचा अर्थ असा की भारतात कोणताही अँड्रॉईड अॅप युजर कोणतीही सर्विस खरेदी करत असेल तर त्याला फक्त गुगलच्या माध्यमातूनच पेमेंट करता येणार आहे.

मात्र CCI ने दिलेल्या आदेशानंतर गुगलने आपलं पेमेंटचं धोरण सध्या रोखलं आहे. गुगलने सांगितलं की, ते आपल्या कायदेशीर मार्गांबद्दल विचार करत आहेत. Google ने आश्वासन दिले आहे की ते Android आणि Play मध्ये गुंतवणूक करत राहील. याआधी गुगलने भारतातील विकासकांसाठी या धोरणाच्या अंमलबजावणीची तारीख ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला 7 दिवसांत दोनदा करोडो रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने अँड्रॉइड जगतात आपल्या मक्तेदारीचा अवाजवी फायदा घेत 1337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. काही दिवसांनंतर, CCI ने Google ला 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे कारण Google ने Play Store मधील मजबूत स्थितीचा गैरफायदा घेतला आहे.

टॅग्स :Google